॥ श्री गु रु च रि ता नं द ॥
ॐ
--
सौजन्य :
श्रीनिसर्गदत्त अध्यात्म केंद्र मुम्बई द्वारा प्रकाशित प्रथम आवृत्ति / 02 एप्रिल 1977
--
लेखक : श्रीयुत श्रीकान्त गोगटे
मुद्रक : श्री रमेश मा. यादव
मनीषा प्रिंटर्स , परळ , मुंबई 12
--
॥ श्री गु रु च रि ता नं द ॥
_______________________
॥ प्रथम उल्लास ॥
ॐ
॥ श्री स द्गु रु स म र्थ ॥
____________________________
ॐ नमो गणेशा गजानना ।
प्रभु आदिनाथनंदना ।
सर्व मूळारंभस्फुरणा ॥
प्रणवरूपा ॥१
नमूं तुज देवी सरस्वती ।
सर्व काव्यकला भारती ।
प्रकाशो गुरुदासाची स्फूर्ती ।
चरित्रगानीं ॥२
नमो नमो श्रीसद्गुरुनाथा ।
कृपामूर्ति श्रीनिसर्गदत्ता ।
तव चरणीं विनम्र माथा ।
दीनबन्धो ॥३
जय जय सद्गुरु उदारा ।
जय जय पतितोद्धारा ।
जय जय दयासागरा ।
स्नेहसिंधो ॥४
अति अगम्य तव महिमा ।
सगुणा निर्गुणा निरुपमा ।
परि गुरुदासा अदम्य प्रेमा ।
गुणगायनीं ॥५
तव हा दास वाक्दुर्बळ ।
गुरुचरित्रगानी नसे बळ ।
कैसे वर्णावे गुण सकळ ।
निर्गुणाचे ॥६
सद्गुरु स्वरूपज्ञानाचार्य ।
परमाकाशीं विज्ञानसूर्य ।
तेथें प्रकाशण्या कैसें धैर्य ।
काजव्यासी ॥७॥
विशुद्ध विज्ञान-पौर्णिमा ।
सद्गुरु स्वरूप-चन्द्रमा ।
कैसा कळे तयाचा महिमा ।
बाघुळासी ॥८॥
सद्गुरु विज्ञान-धन कुबेर ।
गुह्य बोधरत्नांचें भांडार ।
तयाचे मोल न जाणे पामर ।
अभागी रंक ॥९॥
परि दासाची उताविळ वाणी ।
सरसावे अक्षम लेखणी ।
कासयाची घालावी वेसणी ।
अजाणासी ॥१०
ये गे ये गे सद्गुरु माऊली ।
घाली कृपादृष्टिची सावली ।
बाळाच्या हातीं चालवी भली ।
अक्षर रेषा ॥११
तव स्नेहाशीर्वाद किमया ।
वाढवो काव्यस्फूर्ति लीलया ।
गुरुचरितगान गावया ।
लाभो वाणी ॥१२
तव वात्सल्याचिया अंकावरी ।
माये बाळ निर्भयी अंतरी ।
आत्मबोधाचा मधुर भारी ।
देगे पान्हा ॥१३
माये, संकोच नसे बाळासी ।
सदा बिलगे तव वक्षासीं ।
विसावे स्नेहाळ बाहुपाशी ।
माऊलीच्या ॥१४
तेथें बोधामृत-कुंभ पूर्ण ।
बालकमुखीं स्तन्यजीवन ।
न लगे बाळासी अन्य पोषण ।
बलवर्धक ॥१५
अस्फुट अजाण बोबडे बोल ।
माय ऐके सहास्य स्नेहल ।
चुंबी कितीदा मुख कोमल ।
कौतुकाने ॥१६
संदेहीं अडखळती पाय ।
सत्वर हाता धरते माय ।
हळू हळू चालवीत जाय ।
सांभाळोनी ॥१७
श्रमतां कवटाळी सत्वर ।
क्रंदतां बक्षीं देतसे धीर ।
मायेच्या कंठीं विश्वासती कर ।
बालकाचे ॥१८
बाळासी मातेचा पूर्ण विश्वास ।
तव ठायीं गे अनन्य आस ।
चरितगानीं सुयश खास ।
मातृबळें ॥१९
गुरुमाये तव धैर्यवाणी ।
येई निश्चित अन्तर्श्रवणीं ।
दासा वाटे धीर आश्वासनीं ।
आशीर्वचनीं ॥२०
गुरुमायेची जैसी प्रेरणा ।
तैसी स्फूर्ति गुरुदासमना ।
श्रीगुरुचरितानंदगायना ।
कृपामधुर ॥२१
_____________________________________
॥ इति प्रथमोल्लासः ॥
॥ श्री गु रु च र णा र्प ण म स्तु ॥
_____________________________________
--
ॐ
--
॥ श्री गु रु च रि ता नं द ॥
_______________________
॥ द्वितीय उल्लास ॥
ॐ
॥ श्री स द्गु रु स म र्थ ॥
____________________________
नमो श्रीसद्गुरुचरणकमला ।
मानसभ्रमर तेथ रमला ।
दुर्लभ चरितामृतबिन्दुला ।
होई लुब्ध ॥१
रस शोधितां चाले गुणगुण ।
वेचुनी घेई मधु कणकण ।
सेवितां वाढे अंतरीं स्फुरण ।
आनंदगानीं ॥२
जाणण्या गंगा महिमा सकळ ।
शोधावें पवित्र गंगोत्रीमूळ ।
तैसी जाणावी शुभजन्म वेळ ।
चरितारंभीं ॥३
गुरुभक्तां दीर्घकाळ अज्ञात ।
श्रीगुरुची जन्मतिथि निश्चित ।
जन्मोत्सवा उत्सुक बहु भक्त ।
घेती शोध ॥४
पुसतां सस्मित श्रीमहाराज ।
वदती "जन्मतिथीचें काय काज ।
अजन्म्यासी जन्मवार्ता आज ।
कैसी पुसतां" ॥५
सत्य सत्य श्रीसद्गुरुवचन ।
परमात्मस्वरूप जो संपूर्ण ।
तयासी कैसे जनन मरण ।
निर्गुणासी ॥६
श्रीसद्गुरुसी भक्त वदती ।
"श्रीगुरुपरंपरेमाजी चालती ।
जयंती-उत्सव, पुण्यतिथी ।
भक्तिभावें ॥७
तैसा श्रीगुरुजयंती-उत्सव ।
स्वामी, साजरा करूं अभिनव ।
तेणे वाढेल सुभक्तिभाव ।
गुरुभक्तांचा ॥८
तयांची कळकळ पाहोनी ।
सद्गुरु संतुष्ट अंतःकरणीं ।
देती अनुमति प्रसन्न वदनीं ।
स्नेहभरें ॥९
श्रीसद्गुरुकृपेनें अवचित ।
गवसे जन्मतिथि निश्चित ।
भक्तजन अति आनंदित ।
भाग्यबळें ॥१०
पवित्र कांबळी घराण्यांत ।
सत्पिता श्रीशिवरामपंत ।
माता पार्वतीबाई सेवारत ।
पतिव्रता ॥११
भगवत्-भक्त मातापिता ।
व्रतपालनी परम आस्था ।
तन्मय नित्यभजन गातां ।
प्रेमभावें ॥१२
तयांचे उदरीं मुंबापुरीत ।
निर्गुण सगुणी साकारत ।
साधावया भक्तजनहित ।
लौकिकी जन्म ॥१३
शके अठराशे एकोणीस ।
श्रीहनुमान जयंतीस ।
प्रातःकाळीं शुभ समयास ।
जन्म-उदय ॥१४
म्हणोनी शुभ नाम ’मारुती’ ।
बाळसेदार सदृढ मूर्ति ।
देवभजनप्रिय शुद्धमति ।
अतिशयेंसी ॥१५
पुढें प्लेगरोगाच्या साथींत ।
सपरिवार शिवरामपंत ।
जाती जन्मभूमी कोंकणांत ।
नांदावया ॥१६
नररत्नसंपन्न रत्नागिरि ।
मालवणभूमि रम्यभारी ।
तेथें कांदळगांवामाझारी ।
स्थायिकवास ॥१७
चरितार्थस्तव उत्तम शेती ।
गोपालनीं परम प्रीति ।
शिवरामपंत आचरती ।
कृषिकर्म ॥१८
उभयतां पतिपत्नी सात्त्विक ।
दयाळू परहिता उत्सुक ।
गाती भजन उत्साहकारक ।
उच्चस्वरें ॥१९
सप्रेम वाचती रामविजय ।
नवनाथ पोथी, हरिविजय ।
संकष्टी एकादशी अतिशय ।
व्रत पालन ॥२०
विष्णुभटजी गोरे ब्राह्मण ।
सत्त्वशील विद्यासंपन्न ।
कृषिजीवी गरीब सज्जन ।
सत्पुरुष ॥२१
ऐशा ब्राह्मणाच्या सत्संगात ।
नित्य रमती शिवरामपंत ।
पारमार्थिक चर्चा रंगत ।
उभयतांचीं ॥२२
ऐसे नित्य सात्विक संस्कार ।
बाल मारुती सेवी सत्वर ।
सत्त्व बीजा अंकुर जोमदार ।
सद्गुणांचें ॥२३
एकदां महाराज सांगतीं ।
बालपणाचीं प्रथम स्मृति ।
ऐकतां वाटें सूचक अती ।
आध्यात्मिक ॥२४
"एके दिवशीं डोंगरावरून ।
चालतां सकाळीं पूर्वेकडून ।
घडलें उज्ज्वल सूर्यदर्शन ।
चिरस्पष्ट ॥२५
बालमारुती नित्य रानांत ।
गोचारणी मित्रांसंगें रमत ।
नाना कथा उत्साहें सांगत ।
आनंदभरें ॥२६
कृषिकाम करण्या आवडी ।
नाना पुष्पें वेंचण्या गोडीं ।
फलसंवर्धनीं आस्था उघडी ।
स्नेहभावें ॥२७
परदुःख पाहोनी सत्वर ।
सहाय्य करण्या सदा तत्पर ।
अंतरीं कळवळा उदार ।
मधुरवाणी ॥२८
स्थानिक विद्यालयीं ग्रामीण ।
झालें प्राथमिक शिक्षण ।
पुढें शिकण्या मालवण ।
बहुदूर ॥२९
बालकाची बुद्धि जात्याच सूक्ष्म ।
वाटे जिज्ञासा चौफेर परम ।
पाहतां सृष्टिलीला अनुपम ।
रहस्यमय ॥३०
नानाविधरंग फुलावरतीं ।
कोठून कैसे नित्य बहरती ।
तुरट आंबट फळें होती ।
कैसीं मधुर ॥३१
दिसे नियम निसर्गात ।
बिया नेहमीं फळांच्या आंत ।
परि काजूबिया बाहेर दिसतें ।
कोण्याकारणें ॥३२
शेतांत दिसे मातीच माती ।
परि एका दाण्याचे अनेक होती ।
अनेक दाणे कोठून येती ।
नकळे लीला ॥३३
लोक म्हणती जग आहे जुने ।
मग का गरीबी, दुःख भोगणें ।
उच्चनीच भेद कोण्या कारणे ।
समाजांत ॥३४
ऐसे नाना प्रश्न सतावती ।
कोणी करीना जिज्ञासा पूर्ति ।
वयासंगें समस्या वाढती ।
अनिवार ॥३५
फिरे काळाचें अमोघ चक्र ।
घडे विघडे मनुष्य संसार ।
उदय अस्त क्रम साचार ।
सॄष्टिमाजी ॥३६
ओढवे आपत्ति कुटुम्बात ।
देह ठेवती शिवराम पंत ।
देउनी ब्राह्मणमित्रा निश्चित ।
पूर्वसूचना ॥३७
येतां प्रतिकूल परिस्थिति ।
ज्येष्ठ बंधू मुंबईस जाती ।
चरितार्थाची सोय पाहती ।
भाग्यानुसार ॥३८
तेव्हां चरित्रनायक तरुण ।
तया वाटे करावें आपण ।
निजभाग्य शोधण्या प्रयाण ।
मुंबापुरीस ॥३९
जेहवां वय वर्षें एकवीस ।
साधुनी सुयोग्य संधीस ।
केलें गमन भाग्यनगरीस ।
उत्साहभरें ॥४०
मानव चाले पुढत पुढती ।
न कळे भाग्यचक्राची गती ।
जीवनमार्गीं वळणें अति ।
रहस्यमय ॥४१
__________________________________
॥ इति द्वितीयोल्लास ॥
--
॥ श्री गु रु च र णा र्प ण म स्तु ॥
__________________________________
--
ॐ
--
॥ श्री गु रु च रि ता नं द ॥
_______________________
॥ तृतीय उल्लास ॥
ॐ
॥ श्री स द्गु रु स म र्थ ॥
____________________________
नमो श्रीगुरुचरण पावन ।
प्रकटे तेथें गंगेसमान ।
कृपातीर्थ अमृतजीवन ।
संजीवनी ॥१
सेवितां कृपासंजीवनीबिंदु ।
गवसे आत्मानंदाचा सिंधु ।
तेणे वाढो श्रीगुरुसेवानंदु ।
चरितगानीं ॥२
नवल नगरी मुम्बापुरी ।
तिच्या सदा अतृप्त उदरीं ।
नाना उद्योग उलाढाळी भारी ।
रात्रंदिन ॥३
मनुष्य मुंग्यांचें महावारूळ ।
लक्षलक्ष पळती सर्वकाळ ।
मोहलुब्ध रावरंक सकळ ।
नानाप्रकारें ॥४
नसे केवळ मोहनगर ।
जणूं पसरे महाअजगर ।
ग्रासी पचवी क्षुधित उदर ।
असंख्यजीवां ॥५
घेई चरित्रनायक तरुण ।
प्रथम काहीं इंग्रजी शिक्षण ।
उपरान्त राही कारकून ।
अल्पकाळ ॥६
परि स्वभाव स्वतंत्र विचारी ।
तया रुचेना कोठें चाकरी ।
कासया पत्करावी ताबेदारी ।
पोटासाठीं ॥७
शोधितां गवसे स्वतंत्र क्षेत्र ।
मध्यम व्यवसाय व्यापार ।
कल्पक वृत्ती उद्योगी जबर ।
सुनिश्चयी ॥८
व्यवसायीं प्रथम सचोटी ।
तीच यशदायक हातोटी ।
तेणे होतसे निश्चित भेटी ।
धनश्रीची ॥९
चरित्रनायका लक्ष्मी प्रसन्न ।
परि न विसरे नारायण ।
आवडे नित्य पूजनभजन ।
भगवंताचें ॥१०
यथासमयीं गृहस्थाश्रम ।
स्वीकारी समाजकर्मी उत्तम ।
पत्नी सुमतीबाई परम ।
सहधर्मिणी ॥११
चरित्रनायका व्रताचरण ।
आवडे नेमाने उपोषण ।
भुलेश्वरादि देवदर्शन ।
भक्तिभावें ॥१२
मातोश्रींच्या हातीं फुलें अर्पुनी ।
प्रातः प्रणाम पूज्यचरणीं ।
नित्यचारा गोमातेच्या वदनीं ।
सेवाभावें ॥१३
आवडे ग्रंथ देवभक्तीपर ।
विशेष नवनाथ भक्तिसार ।
तेणे गुरुभक्तीचे संस्कार ।
दृढावती ॥१४
त्याकाळीं नजीक गिरगावांत ।
योगी आठवले वास करीत ।
तयापाशीं योगशिक्षण घेत ।
आवडीनें ॥१५
समानशील स्नेही उदार ।
यशवंतराव बागकर ।
तयांसंगें गोष्टी भक्तिपर ।
चालती नित्य ॥१६
बागकर जाती संतदर्शना ।
तयांच्यां कथा सांगती नाना ।
भावरसाळ वर्णन श्रवणा ।
लागे गोड ॥१७
साग्रह वदती बागकर ।
"चला मजसंगें एकवार ।
संतसंग साधावा हितकर ।
श्रद्धाभावें " ॥१८
देती उत्तर चरित्रनायक ।
"तुमचें वचन हितकारक ।
मजहि आदर वाटे सम्यक ।
संतवचनीं ॥१९
परि ह्या बकाली शहरांत ।
अति दुर्लभ खरा साधुसंत ।
बुवावेषी संधीसाधु बहुत ।
स्वार्थी भोंदू ॥२०
ऐशा मनुष्याकृतीचे चरण ।
न कदापि समस्तक वंदीन ।
ही माझी प्रतिज्ञा मज प्रमाण ।
निश्चयेंसी ॥२१
शोधुनी न भेटती संतजन ।
लाभे आपोआप शुभदर्शन ।
तत्काळ पटे अंतरीं खूण ।
पुण्यबळें ॥२२
ऐसा भाव परम सोज्वळ ।
पहा होईल सत्वर सफळ ।
पुढील गुरुकृपारसाळ ।
उल्लासांत ॥२३
॥ इति तृतीयोल्लासः ॥
_____________________
॥ श्री गु रु च र णा र्प ण म स्तु ॥
______________________
*
ॐ
--
॥ श्री गु रु च रि ता नं द ॥
_______________________
॥ चतुर्थ उल्लास ॥
ॐ
॥ श्री स द्गु रु स म र्थ ॥
____________________________
नमो श्री सद्गुरुकृपाघन ।
चिदाकाशीं वर्षाव प्रसन्न ।
तेणे भक्तचातकाचें सुमन ।
प्रफुल्लित ॥१
तयाची सुरंग शोभा कोमल ।
स्निग्ध भावरस परिमल ।
पसरे काव्यानंद मंगल ।
चरितगानीं ॥२
त्याकाळीं परम योगीराज ।
श्रीसिद्धेश्वर महाराज ।
करिती ज्ञानदानाचें काज ।
मुंबापुरींत ॥३
तयांचे दर्शना बागकर जातीं ।
यथाकाळीं अनुग्रह प्राप्ती ।
अंतरीं समाधान पावतीं ।
गुरुकृपेने ॥४
ते म्हंअतीं चरित्रनायकास ।
"चला एकवार दर्शनास ।
ठेवा ममवचनीं विश्वास ।
सत्कारणीं "॥५
सन्मित्राचा आग्रह पाहोनी ।
करी गमन संत दर्शनीं ।
अंतर्मुख बोध पडे श्रवणीं ।
सुकठीण ॥६
परि अंतर्यामीं अभिनव ।
जाणवे संततेजाचा प्रभाव ।
घ्हडे गमन दर्शनास्तव ।
वारंवार ॥७
प्रसन्न कृपाळू सद्गुरुसंत ।
तारक नाममंत्र सांगत ।
पटवून खूण हातोहात ।
निश्चयेंसी ॥८
सद्गुरु बोलतीं शब्द मधुर ।
"तुज हवें तें न चहाती इतर ।
इतर जनां हवें तें खरोख्रर ।
नको तुजला ॥९
पटतां खूण सद्गुरुवचनीं ।
साधक बैसे मनोजप ध्यानीं ।
गुंजरे सुमधुर नामध्वनी ।
अंतरांत ॥१०
होई चित्त एकाग्र सत्वर ।
भासती दिव्य रंग सुंदर ।
लाभली ध्यानावस्था साचार ।
आनंदमय ॥११
लाभतां सप्रचीत समाधान ।
सद्गुरुवचनीं विश्वास पूर्ण ।
परम पद सद्गुरुचरण ।
सत्शिष्यासी ॥१२
लाभो सद्गुरुपरंपरा थोर ।
नवनाथ पंथाची उदार ।
श्रीरेवणनाथ साधार ।
मूळ गुरु ॥१३
तयांपासून श्रीमरुळसिद्ध ।
सिद्धगिरीचे श्रीकाडसिद्ध ।
श्रीगुरुलिंगजंगम प्रसिद्ध ।
निंबरगीचे ॥१४
तत्शिष्य थोर श्री उमदीशराज ।
श्रीभाऊसाहेब महाआज ।
तयांचा समाधिवास सहज ।
इंचगिरीसी ॥१५
तयांचे सत्शिष्य पाथरीवासी ।
श्रीसिद्धरामेश्वर तेजोराशी ।
विज्ञानबोध देती शिष्यांसी ।
निरंतर ॥१६
हाचि थोर सिद्धसंप्रदाय ।
अथवा स्वरूपसंप्रदाय ।
शुद्ध ज्ञान-भक्तीचा समुच्चय ।
आत्मज्ञानीं ॥१७
श्रीसिद्धरामप्रभूचे निश्चित ।
श्रीमारुतीराय अनन्य भक्त ।
पूजनींभजनीं सदा रंगत ।
प्रेमानंदें ॥१८
देहमनीं जातीं लोटांगणीं ।
परमपूज्य सद्गुरुचरणीं ।
नुरली आस्था अंतःकरणीं ।
प्रपंचाची ॥१९
तत्पर प्राप्त कर्तव्यांत ।
पत्नीपुत्र कन्यांसहित ।
परि कर्ता सद्गुरु निश्चित ।
निश्चिय ऐसा ॥२०
सद्गुरुवचन हेंचि शास्त्र ।
वाटे बाकी सकळ अशास्त्र ।
सद्गुरुपदीं निष्ठा हेंचि शस्त्र ।
शिष्यवीरांचें ॥२१
बाणे ऐसा निश्चयाचा निश्चय ।
चित्त सदा निश्चिंत निर्भय ।
प्रकाशे सद्गुरुकृपा सूर्य ।
अंतर्यामीं ॥२२
चाले उत्स्फूर्त सकळ साधना ।
पूजाभजन ध्यान उपासना ।
साधनाकष्ट जाणवेना मना ।
कृपाबळें ।२३
नित्यश्रीसद्गुरुदर्शन ।
अगत्य सेवा धर्मपालन ।
भजन निरूपणश्रवण ।
एकाग्रचित्तें ॥२४
श्रीगुरुसंगें पाथरीग्रामासी ।
जातीं नेमें क्षेत्र इंचगिरीसी
सप्ताहास्तव बागेवाडीसी ।
उत्साहभरें ॥२५
चालता ऐसी यथार्थ साधना ।
ध्यानीं येती साधू देवता नाना ।
दिव्य प्रकाश नाद श्रवणा ।
अंतराकाशीं ॥२६
वाढतां सूक्ष्म बुद्धींचें तेज ।
गुह्य ग्रंथवर्म कळें सहज ।
वैखरी वाणींत प्रकटे ओज ।
प्रतिभादीप्त ॥२७
एकदा गुरुबंधुगृहीं जातीं ।
उत्स्फूर्त निरूपणें सांगतीं ।
आनंदें बागकर वदतीं ।
कौतुकभरें ॥२८
"देववृक्ष सत्यभामा सदनीं ।
परि फुलें रुक्मिणी अंगणीं ।
ऐसें नवल आज वाटें मनीं ।
गुरुकृपेचें ॥२९
लाभला श्रीगुरुसहवास ।
तीन वर्षें श्रीमहाराजांस ।
अंतीं पातलें साल छत्तीस ।
निर्वाणाचें ॥३०
जाणोनि गुरुकार्यसमाप्ति ।
श्रीसिद्धराम देह ठेविती ।
आश्विन वद्य एकादशी तिथि ।
पुण्ययोग ॥३१
हरपे सगुण सद्गुरुरूप ।
हाय, कोठें पूज्य मायबाप ।
भक्तहृदयीं दारुण कंप ।
वियोगाचा ॥३२
शून्य भासे अवघी धरती ।
तप्त दुःखाश्रुधारा झरती ।
कोठें पहावी सद्गुरुमूर्ती ।
प्रियदर्शन ॥३३
दाटे हृदयीं विरह दाहक ।
हरपे, नाठवे तहान भूक ।
स्मरती श्रीगुरुचे शब्द वेधक ।
वारंवार ॥३४
"शिष्यांमाजीं अनेक विद्वान ।
अनेक व्यवसायी सधन ।
अनेक अधिकार संपन्न ।
राजकर्मी ॥३५
परि ऐसा कोण शिष्यवर ।
जो सद्गुरु वचनाखातर ।
सर्वत्याग करण्या तत्पर ।
अनन्यभावें ॥३६
श्रीगुरुचा शोधक शब्दबाण ।
वेधी सत्शिष्याचें अंतःकरण ।
सदा तयाचें अनुसंधान ।
आपेआप ॥३७
न रुचे प्रपंच व्यवसाय ।
आवडे जीवन त्यागमय ।
अनिकेत निःशंक निर्भय ।
वैराग्यशील ॥३८
क्रमे पातली पुढील दिवाळी ।
सर्वत्यागाची उर्मि उसळली ।
भरसणांत पावलें वळलीं ।
परिभ्रमणा ॥३९
मागें सांडिला संपन्न संसार ।
प्रेमळमाता पत्नीकन्यापुत्र ।
कोणासी न सांगतां सत्वर ।
मुंबईत्याग ॥४०
’जयगुरु जयगुरु’ स्मरोनीं ।
निघती निःसंग परिभ्रमणीं ।
पातलें महायोग पीठस्थानीं ।
पंढरीसी ॥४१
त्यजुनी सारें अवशिष्ट धन ।
अंगावर जें वस्त्र प्रावरण ।
तयाचें सढळ दिधलें दान ।
गोरगरीबां ॥४२
शोभे साधा पंचा घोंगडी काठी ।
प्रखर वैराग्य भरतां पोटीं ।
हवी जया गुरुकृपेची भेटी ।
केवळचि ॥४३
चाले अखंड सद्गुरुस्मरण ।
नामस्मरण चिंतनमनन ।
एकाग्रचित्ती अनुसंधान ।
आत्मस्वरूपी ॥४४
नसे अन्नवस्त्राची मुळीं चिंता ।
श्रीसद्गुरु तयांचा रक्षिता ।
जेवीं बालका संभाळी माता ।
रात्रंदिवस ॥४५
नकळे भाषा दक्षिन प्रांती ।
दोन घांस न मागतां मिळती ।
स्वच्छंद पदयात्रेची गति ।
अखंडित ॥४६
दीर्घ वाटचाल चालोनी ।
पोळती पावलें अनवाणी ।
परि आनंद श्रीगुरुस्मरणीं ।
कृपाशीतल ॥४७
सेवितां वृक्षातळीं विश्रांती ।
तप्त पावलें न्याहाळती ।
प्रगटे दिव्य श्रीसद्गुरुमूर्ति ।
प्रियदर्शन ॥४८
तत्काळ सर्वश्रम परिहार ।
उचंबळे गुरुप्रेम अपार ।
कृपामृत सेवितां अनिवार ।
झरती अश्रू ॥४९
मासामागून सरती मास ।
प्रपच विसरोनी सद्गुरुदास ।
दक्षिण भ्रमणांतीं उत्तरेस ।
चालती वाट ॥५०
एकदां भ्रमतां मरुभूमींत ।
निर्जन उजाड रखरखीत ।
सूर्य माथ्यावर धगधगीत ।
मध्यान्ह काळीं ॥५१
अंतरीं अखंड नामस्मरण ।
दिसेना बाह्य विश्रांतिस्थान ।
नसे पाणी शमविण्या तहान ।
जरी ना अन्न ॥५२
पुढें चालती ’जयगुरु’ स्मरोनी ।
सर्व भार सद्गुरुचरणीं ।
तेणे सर्वदा निश्चिंत मनीं ।
परिभ्रमण ॥५३
दिसे अकस्मात् दूर वस्ती ।
विश्रांतीस्तव तिकडे वळती ।
सन्मुख एका झोपडी पुढती ।
उपस्थित ॥५४
अतिथी साधू पाहोनी दारीं ।
मालक देई पाणी भाकरी ।
तेंचि सेवितीं मानुनी अंतरीं ।
गुरुप्रसाद ॥५५
चालतां काही पवलें मार्गांत ।
चमके विचार अवचित ।
कैसी झोपडी वाळवंटांत ।
भेटली इथे ॥५६
सहज वळून मागें पहाती ।
कोठें देसेना झोपडी ती ।
जणू विरली नवल वस्ती ।
स्वप्नासमान ॥५७
प्रत्यक्ष गुरुकृपेचा महिमा ।
देखतां उचंबळे गुरुप्रेमा ।
स्मरतां श्रीसद्गुरु सिद्धरामा ।
झरती अश्रू ॥५८
पदयात्रा चालतां बहुमास ।
पातले राजधानी दिल्लीस ।
जावें हिमालयीं तपश्चर्येस् ।
ऐसी वासना ॥५९
संसार सांडला जाहलें ठीक ।
मिथ्याती उपाधि निरर्थक ।
करावें नरजन्माचें सार्थक ।
गिरिकंदरीं ॥६०
अंतरीं दृढावे ऐसा बेत ।
परि वेगळेंचि विधिलिखित ।
भेटे गुरुबंधु अवचित ।
सन्माननीय ॥६१
गुरुबंधु बोले "अहो निःसंग ।
धन्यधन्य तुमचा सर्व त्याग ।
तेथून पुढें कोणता मार्ग ।
सांगा मजसी" ॥६२
ऐकोनी हिमालयवासाचा बेत ।
गुरुबंधु म्हणे, "नव्हे हें उचित ।
करावें कर्तव्य संसारांत ।
पत्करलें जें ॥६३
प्रपञ्च साधुनी परमार्थ ।
हाचि आम्हां गुरुबोध यथार्थ् ।
पहा गुरुपरंपरा समर्थ ।
काय सांगे ॥६४
जाणोनि निज सत्यस्वरूप ।
प्रपञ्च करावा परमार्थरूप ।
साधावा लोकसंग्रह अमाप ।
सर्वहितासी ॥६५
’तोचि ज्ञानी खरा तारी दुजियांसी’ ।
ओळखा या अभंग-वचनासी ।
लोकारण्यामाजी एकांतवासी ।
यथार्थ ज्ञानी ॥६६
जैसें कमलपत्र पाण्यांत ।
अथवा तरंगे नवनीत ।
तैसाज्ञानी राहे संसारांत ।
स्थितप्रज्ञ" ॥६७
ज्येष्ठ गुरुबंधु गुरुसमान ।
त्याचें वचन मानुनी प्रणाम ।
मान्य जाहलें अंती गमन ।
मुंबापुरीसी ॥६८
गुरुबंधू स्नेहशील उदार ।
सहाय्य करण्या अतितत्पर ।
साधुवेष त्यागुनी सत्वर ।
माघारीं येतीं ॥६९
संतोषतीं निकट आप्तजन ।
अवघे गुरुबंधु सज्जन ।
चाले उदंड गुरुभजन ।
आनंदभरें ॥७०
भावी भक्तांचें सौभाग्य परम ।
लाभले श्रीमहाराज अनुपम ।
तीच कथा ऐका रसाळ पञ्चम ।
उल्लासांत ॥७१
--
॥ इति चतुर्थोल्लास ॥
______________________
॥ श्री गु रु च र णा र्प ण म स्तु ॥
______________________
*
ॐ
--
॥ श्री गु रु च रि ता नं द ॥
_______________________
॥ पञ्चम उल्लास ॥
________________________
ॐ
॥ श्री स द्गु रु स म र्थ ॥
____________________________
नमो श्रीसद्गुरु आत्मारामा ।
निर्विकल्प परमानंद धामा ।
न कळे न कळेतव महिमा ।
वेदश्रुतीसी ॥१
तव कृपाबळें केवळ ।
गाईन चरितगान रसाळ ।
वाक्दुर्बळासी वाणीबळ ।
तवप्रसादे ॥२
श्रीमहाराज सोसती शांतमनीं ।
व्यवसायाची अपार हानी ।
चरितार्थस्तव बैसती दुकानी ।
एकमेव ॥३
पडती अन्य दुकाने परहाती ।
परि श्रीमहाराज संतोषती ।
म्हणती बरवें जाहले गेली ती ।
उपाधिभारी ॥४
उपजीविकेस्तव व्यवसाय ।
व्यवहार करिती हस्तद्वय ।
परि चित्त सदातन्मय ।
गुरुस्मरणीं ॥५
मुखीं अंतरीं सहज मौन ।
जनीं परिमित संभाषण ।
स्वरूपानुसंधानी सदामग्न ।
अंतर्मुख ॥६
एकमुखी निष्ठा सद्गुरुचरणीं ।
न वाटे जावें बाह्य देवस्थानी ।
अथवा अन्य साधुदर्शनीं ।
कदाकाळीं ॥७
ध्यानधारणा नित्यनेमस्त ।
चाले सर्वदा सहजस्फूर्त ।
त्रिकाल भजनीं प्रेमे रंगत ।
अनन्यभावें ॥८
दासबोध योगवासिष्ठवाचन ।
चाले अंतरीं चिंतनमनन ।
ध्यानामाजी शंकानिरसन ।
आपेआप ॥९
हरपे भान उत्कट भजनीं ।
दंग आत्मप्रकाश दर्शनीं ।
झळके तेजाळ कुंडलिनी ।
आत्मशक्ति ॥१०
नाना दिव्य अनाहत नाद ।
उसळे अंतरीं परमानंद ।
ऐसा लाभे दिव्य गुरुप्रसाद ।
सुधामधुर ॥११
जैसा गज शिरतांमदोन्मत्त ।
झोपडी भग्न डळमळीत ।
तैसा देह होय व्याधिग्रस्त ।
योगसाधनीं ॥१२
परि सद्गुरुनिष्ठा अढळ ।
तेचिं सत्शिष्याचे खरें बळ ।
तेणें शीघ्र निरसती सकळ ।
अधिंव्याधी ॥१३
होतां चित्तशुद्धिसाधना पूर्ण ।
जाहलें निजांगें स्वरूपज्ञान ।
अपरोक्ष सच्चिदानंदघन ।
साक्षात्कार ॥१४
प्रकटे अलक्ष आत्मज्योति ।
शुद्ध निजरूप जगज्ज्योति ॥
नित्य निरंजन सर्वात्मत्मस्थिति ।
अद्वयवस्तु ॥१५
तेंचि शुद्ध चैतन्य-रसाळ ।
श्रीगुरुकृपेचें अमृतफळ ।
जीवनमुक्तिरूप केवळ ।
सिद्धस्थिति ॥१६
चाले निर्लिप्त बाह्य व्यवहार ।
सुखदुःखीं समदृष्टि सुस्थिर ।
सौम्य शांत सुधीर गंभीर ।
स्थितप्रज्ञ ॥१७
झेलती नाना आघात दारुण ।
माता-पिता-कन्या निधन ।
व्यवसायी अपार हानी कठिण ।
समस्यारूप ॥१८
परि निश्चिंत निर्भय निश्चल ।
वदती सिसुनी विपत्ती सकळ ।
"असेल माझे भाग्य तर येतील ।
संकटें नित्य "॥१९
टाळण्या उपाधि कोठें न जातीं ।
अथवा कोणासी न पाचारती ।
दुकानीं वा गृह-गुहेंत बैसतीं ।
एकांतवासी ॥२०
परि पुष्पगंध वा सत्त्वतेज ।
कधीं ना कधीं प्रकटे सहज ।
तैसे तळपती श्रीमहाराज ।
तपोमूर्ति ॥२१
प्रिय गुरुबंधू श्रीभाईनाथ ।
शांत सौम्य सात्त्विक यथार्थ ।
चोखाळती ज्‘जान-भक्ति सुपंथ ।
निश्चयेंसी ॥२२
ते भेटती रात्री नित्य नियमित ।
तयांसंगें ज्ञानचर्चा एकांतांत ।
उपेक्षुनी सकळ वर्षा शीत ।
विघ्नेंनाना ॥२३
उभयतांची गाध स्नेहभेटी ।
तियेसी न होय कदापि तुटी ।
असतां एकरूप ज्ञानदृष्टि ।
विज्ञानासी ॥२४
पाहोनी प्रगट सिद्धतेज ।
जमती चहाते भक्त सहज ।
परि उपेक्षती श्रीमहाराज ।
तैसी उपाधि ॥२५
विनविति भक्त वारंवार ।
करावा गुरुबोध सत्वर ।
राहू अज्ञापालनी तत्पर ।
सर्वकाळीं ॥२६
परि श्रीमहाराज दुर्लक्षती ।
गुरुपदाची उपाधि टाळती ।
रोखुनी दाहक दृष्टिं बोलती ।
कठोर शब्द ॥२७
गुरुदीक्षेस्तव हट्टी भक्तांसी ।
धाडिती अन्य गुरुबंधूपाशीं ।
परि कदापि न रुचे अनन्यांसी ।
पर्याय तैसा ॥२८
प्रतीक्षा करिती ऐसे भक्त ।
वर्षानुवर्षें दर्शना जात ।
गुरुकृपेस्तव तळमळे चित्त ।
अतिशयेंसी ॥२९
सद्गुरु-आदेश लाभोनि अंतॊं ।
श्रीमहाराज नाममंत्र देतीं ।
ज्ञान-भक्तीचा बोध करिती ।
अमृतोपम ॥३०
शिष्य जमती गुरु-आश्रामात ।
श्रीसिद्धराम पूजन नियमित ।
ध्यान-भजनीं निरूपणीं रंगत ।
श्रीगुरुसंगें ॥३१
श्रीमहाराज स्नेहाळ ।
निर्लोभी निस्पृह निर्मळ ।
चाले ज्ञानदान नित्य बहुकाल ।
निरपेक्ष ॥३२
वाक्शैली न-विचारी उत्स्फूर्त ।
प्रभावी आत्मनिश्चयी निश्चित ।
विशिष्टार्थ आगळे स्वप्रचीत ।
आध्यात्मिक ॥३३
गुरुसामर्थ्याची प्रचीति शिष्यांसी ।
परि नसे भीड श्रीमहाराजांसी ।
मानती सिद्धि-चमत्कारांसी ।
अस्पृश्यचि ॥३४
प्रगट अभिमान गुरुनाम ।
श्रीनिसर्गदत्त यथार्थ परम ।
आकळे ज्ञानदृष्टीने वर्म ।
विनासायास ॥३५
निसर्ग म्हणजे अखंड सहज ।
दत्त म्हणजे हजर प्रत्यक्ष ।
निसर्गदत्त म्हणजे सत्यस्वरूप ।
श्रीसमृद्ध ॥३६
श्रीमहाराज कांहीं न मागती ।
भार न घालती शिष्यांवरतीं ।
श्रीसमर्थवचन निरोपिती ।
स्वप्रचीतीनें ॥३७
"ऐका शिष्या येथीच वर्म ।
स्वयें तूंचि आहेसी ब्रह्म ।
ये विषयीं संदेह भ्रम ।
धंरुचि नको ॥३८
सोऽहं आत्मा स्वानंदघन ।
अजन्मा तो तूंचि जाण ।
हेंचि साधूचें वचन ।
सदृढ धरावें ॥३९
हाचि गुरुमंत्र बोध यथार्थ ।
साधी साधकाचा परम स्वार्थ ।
शिवस्वरूपें होय परमार्थ ।
स्वरूपसिद्ध ॥४०
शोधावें अखंड सावधान ।
अहं जाणिवेचे उगमस्थान ।
तेंचि निजांगें शुद्ध आत्मज्ञान ।
सर्वात्मक ॥४१
त्या ठायीं प्रकटे मूळ कालातीत ।
आपलें असणें अवस्थातीत ।
अलक्ष अनाम स्वरूप शाश्वत ।
आत्मपद ॥४२
ऐसें उत्स्फूर्त स्वानंदघन ।
सहज स्वस्वरूपानुसंधान ।
हेंचि सोपें नैसर्गिक साधन ।
निसर्गयोग ॥४३
धरावें निसर्ग-योग वर्म पोटीं ।
साध्य-साधक-साधन-त्रिपुटी ।
सांडुनी आपली आपणा भेटी ॥
मूळठायीं ॥४४
सद्गुरुबोधाची ही ज्ञानज्योति ।
साधकांसी विशुद्ध तेजारति ।
सेवितां विवेक वैराग्य प्राप्ति ।
विभूतिरूप ॥४५
सद्गुरुप्रसादज्ञानामृत ।
संतोष समाधान अखंडित ।
सदा अंतर्मुख आत्मरत ।
गुरुचरणीं ॥४६
शांतिलाभ निजांगें अमोलिक ।
यथार्थ जीवनाचें सार्थक ।
ऐसा सद्गुरुचरणसेवक ।
कृतकृत्य ॥४७
ईश्वर- गुरु-आत्मा एकरूप ।
ऐसा निजविश्वास आपेआप ।
तोचि आत्मयोगी परंतप ।
सद्गुरुभक्त ॥४८
धन्य धन्य सद्गुरुभक्ति ।
धन्य धन्य गुरुकृपाप्राप्ति ।
न वर्णवे निगूढ महति ।
अवर्णनीय ॥४९
अगम्य संतसद्गुरुमहिमा ।
न चले मायिक सगुण उपमा ।
सहज मौन अथांग गुरुप्रेमा ।
मौनामाजी ॥५०
आतां विश्वात्मकें सद्गुरुदेवें ।
येणें शब्दोल्लासे संतोषावें ।
ऐकतां बोबड बोल हेलावें ।
माऊली जैसी ॥५१
नुरे अक्षम लेखणीची धांव ।
बरवा गुरुपदीं मौन भाव ।
विनवी गुरुदास द्यावा ठाव ।
कृपावक्षीं ॥५२
--
इति पञ्चमोल्लासः
_____________________
॥ श्री गु रु च र णा र्प ण म स्तु ॥
______________________
ॐ
ॐ
--
सौजन्य :
श्रीनिसर्गदत्त अध्यात्म केंद्र मुम्बई द्वारा प्रकाशित प्रथम आवृत्ति / 02 एप्रिल 1977
--
लेखक : श्रीयुत श्रीकान्त गोगटे
मुद्रक : श्री रमेश मा. यादव
मनीषा प्रिंटर्स , परळ , मुंबई 12
--
॥ श्री गु रु च रि ता नं द ॥
_______________________
॥ प्रथम उल्लास ॥
ॐ
॥ श्री स द्गु रु स म र्थ ॥
____________________________
ॐ नमो गणेशा गजानना ।
प्रभु आदिनाथनंदना ।
सर्व मूळारंभस्फुरणा ॥
प्रणवरूपा ॥१
नमूं तुज देवी सरस्वती ।
सर्व काव्यकला भारती ।
प्रकाशो गुरुदासाची स्फूर्ती ।
चरित्रगानीं ॥२
नमो नमो श्रीसद्गुरुनाथा ।
कृपामूर्ति श्रीनिसर्गदत्ता ।
तव चरणीं विनम्र माथा ।
दीनबन्धो ॥३
जय जय सद्गुरु उदारा ।
जय जय पतितोद्धारा ।
जय जय दयासागरा ।
स्नेहसिंधो ॥४
अति अगम्य तव महिमा ।
सगुणा निर्गुणा निरुपमा ।
परि गुरुदासा अदम्य प्रेमा ।
गुणगायनीं ॥५
तव हा दास वाक्दुर्बळ ।
गुरुचरित्रगानी नसे बळ ।
कैसे वर्णावे गुण सकळ ।
निर्गुणाचे ॥६
सद्गुरु स्वरूपज्ञानाचार्य ।
परमाकाशीं विज्ञानसूर्य ।
तेथें प्रकाशण्या कैसें धैर्य ।
काजव्यासी ॥७॥
विशुद्ध विज्ञान-पौर्णिमा ।
सद्गुरु स्वरूप-चन्द्रमा ।
कैसा कळे तयाचा महिमा ।
बाघुळासी ॥८॥
सद्गुरु विज्ञान-धन कुबेर ।
गुह्य बोधरत्नांचें भांडार ।
तयाचे मोल न जाणे पामर ।
अभागी रंक ॥९॥
परि दासाची उताविळ वाणी ।
सरसावे अक्षम लेखणी ।
कासयाची घालावी वेसणी ।
अजाणासी ॥१०
ये गे ये गे सद्गुरु माऊली ।
घाली कृपादृष्टिची सावली ।
बाळाच्या हातीं चालवी भली ।
अक्षर रेषा ॥११
तव स्नेहाशीर्वाद किमया ।
वाढवो काव्यस्फूर्ति लीलया ।
गुरुचरितगान गावया ।
लाभो वाणी ॥१२
तव वात्सल्याचिया अंकावरी ।
माये बाळ निर्भयी अंतरी ।
आत्मबोधाचा मधुर भारी ।
देगे पान्हा ॥१३
माये, संकोच नसे बाळासी ।
सदा बिलगे तव वक्षासीं ।
विसावे स्नेहाळ बाहुपाशी ।
माऊलीच्या ॥१४
तेथें बोधामृत-कुंभ पूर्ण ।
बालकमुखीं स्तन्यजीवन ।
न लगे बाळासी अन्य पोषण ।
बलवर्धक ॥१५
अस्फुट अजाण बोबडे बोल ।
माय ऐके सहास्य स्नेहल ।
चुंबी कितीदा मुख कोमल ।
कौतुकाने ॥१६
संदेहीं अडखळती पाय ।
सत्वर हाता धरते माय ।
हळू हळू चालवीत जाय ।
सांभाळोनी ॥१७
श्रमतां कवटाळी सत्वर ।
क्रंदतां बक्षीं देतसे धीर ।
मायेच्या कंठीं विश्वासती कर ।
बालकाचे ॥१८
बाळासी मातेचा पूर्ण विश्वास ।
तव ठायीं गे अनन्य आस ।
चरितगानीं सुयश खास ।
मातृबळें ॥१९
गुरुमाये तव धैर्यवाणी ।
येई निश्चित अन्तर्श्रवणीं ।
दासा वाटे धीर आश्वासनीं ।
आशीर्वचनीं ॥२०
गुरुमायेची जैसी प्रेरणा ।
तैसी स्फूर्ति गुरुदासमना ।
श्रीगुरुचरितानंदगायना ।
कृपामधुर ॥२१
_____________________________________
॥ इति प्रथमोल्लासः ॥
॥ श्री गु रु च र णा र्प ण म स्तु ॥
_____________________________________
--
ॐ
--
॥ श्री गु रु च रि ता नं द ॥
_______________________
॥ द्वितीय उल्लास ॥
ॐ
॥ श्री स द्गु रु स म र्थ ॥
____________________________
नमो श्रीसद्गुरुचरणकमला ।
मानसभ्रमर तेथ रमला ।
दुर्लभ चरितामृतबिन्दुला ।
होई लुब्ध ॥१
रस शोधितां चाले गुणगुण ।
वेचुनी घेई मधु कणकण ।
सेवितां वाढे अंतरीं स्फुरण ।
आनंदगानीं ॥२
जाणण्या गंगा महिमा सकळ ।
शोधावें पवित्र गंगोत्रीमूळ ।
तैसी जाणावी शुभजन्म वेळ ।
चरितारंभीं ॥३
गुरुभक्तां दीर्घकाळ अज्ञात ।
श्रीगुरुची जन्मतिथि निश्चित ।
जन्मोत्सवा उत्सुक बहु भक्त ।
घेती शोध ॥४
पुसतां सस्मित श्रीमहाराज ।
वदती "जन्मतिथीचें काय काज ।
अजन्म्यासी जन्मवार्ता आज ।
कैसी पुसतां" ॥५
सत्य सत्य श्रीसद्गुरुवचन ।
परमात्मस्वरूप जो संपूर्ण ।
तयासी कैसे जनन मरण ।
निर्गुणासी ॥६
श्रीसद्गुरुसी भक्त वदती ।
"श्रीगुरुपरंपरेमाजी चालती ।
जयंती-उत्सव, पुण्यतिथी ।
भक्तिभावें ॥७
तैसा श्रीगुरुजयंती-उत्सव ।
स्वामी, साजरा करूं अभिनव ।
तेणे वाढेल सुभक्तिभाव ।
गुरुभक्तांचा ॥८
तयांची कळकळ पाहोनी ।
सद्गुरु संतुष्ट अंतःकरणीं ।
देती अनुमति प्रसन्न वदनीं ।
स्नेहभरें ॥९
श्रीसद्गुरुकृपेनें अवचित ।
गवसे जन्मतिथि निश्चित ।
भक्तजन अति आनंदित ।
भाग्यबळें ॥१०
पवित्र कांबळी घराण्यांत ।
सत्पिता श्रीशिवरामपंत ।
माता पार्वतीबाई सेवारत ।
पतिव्रता ॥११
भगवत्-भक्त मातापिता ।
व्रतपालनी परम आस्था ।
तन्मय नित्यभजन गातां ।
प्रेमभावें ॥१२
तयांचे उदरीं मुंबापुरीत ।
निर्गुण सगुणी साकारत ।
साधावया भक्तजनहित ।
लौकिकी जन्म ॥१३
शके अठराशे एकोणीस ।
श्रीहनुमान जयंतीस ।
प्रातःकाळीं शुभ समयास ।
जन्म-उदय ॥१४
म्हणोनी शुभ नाम ’मारुती’ ।
बाळसेदार सदृढ मूर्ति ।
देवभजनप्रिय शुद्धमति ।
अतिशयेंसी ॥१५
पुढें प्लेगरोगाच्या साथींत ।
सपरिवार शिवरामपंत ।
जाती जन्मभूमी कोंकणांत ।
नांदावया ॥१६
नररत्नसंपन्न रत्नागिरि ।
मालवणभूमि रम्यभारी ।
तेथें कांदळगांवामाझारी ।
स्थायिकवास ॥१७
चरितार्थस्तव उत्तम शेती ।
गोपालनीं परम प्रीति ।
शिवरामपंत आचरती ।
कृषिकर्म ॥१८
उभयतां पतिपत्नी सात्त्विक ।
दयाळू परहिता उत्सुक ।
गाती भजन उत्साहकारक ।
उच्चस्वरें ॥१९
सप्रेम वाचती रामविजय ।
नवनाथ पोथी, हरिविजय ।
संकष्टी एकादशी अतिशय ।
व्रत पालन ॥२०
विष्णुभटजी गोरे ब्राह्मण ।
सत्त्वशील विद्यासंपन्न ।
कृषिजीवी गरीब सज्जन ।
सत्पुरुष ॥२१
ऐशा ब्राह्मणाच्या सत्संगात ।
नित्य रमती शिवरामपंत ।
पारमार्थिक चर्चा रंगत ।
उभयतांचीं ॥२२
ऐसे नित्य सात्विक संस्कार ।
बाल मारुती सेवी सत्वर ।
सत्त्व बीजा अंकुर जोमदार ।
सद्गुणांचें ॥२३
एकदां महाराज सांगतीं ।
बालपणाचीं प्रथम स्मृति ।
ऐकतां वाटें सूचक अती ।
आध्यात्मिक ॥२४
"एके दिवशीं डोंगरावरून ।
चालतां सकाळीं पूर्वेकडून ।
घडलें उज्ज्वल सूर्यदर्शन ।
चिरस्पष्ट ॥२५
बालमारुती नित्य रानांत ।
गोचारणी मित्रांसंगें रमत ।
नाना कथा उत्साहें सांगत ।
आनंदभरें ॥२६
कृषिकाम करण्या आवडी ।
नाना पुष्पें वेंचण्या गोडीं ।
फलसंवर्धनीं आस्था उघडी ।
स्नेहभावें ॥२७
परदुःख पाहोनी सत्वर ।
सहाय्य करण्या सदा तत्पर ।
अंतरीं कळवळा उदार ।
मधुरवाणी ॥२८
स्थानिक विद्यालयीं ग्रामीण ।
झालें प्राथमिक शिक्षण ।
पुढें शिकण्या मालवण ।
बहुदूर ॥२९
बालकाची बुद्धि जात्याच सूक्ष्म ।
वाटे जिज्ञासा चौफेर परम ।
पाहतां सृष्टिलीला अनुपम ।
रहस्यमय ॥३०
नानाविधरंग फुलावरतीं ।
कोठून कैसे नित्य बहरती ।
तुरट आंबट फळें होती ।
कैसीं मधुर ॥३१
दिसे नियम निसर्गात ।
बिया नेहमीं फळांच्या आंत ।
परि काजूबिया बाहेर दिसतें ।
कोण्याकारणें ॥३२
शेतांत दिसे मातीच माती ।
परि एका दाण्याचे अनेक होती ।
अनेक दाणे कोठून येती ।
नकळे लीला ॥३३
लोक म्हणती जग आहे जुने ।
मग का गरीबी, दुःख भोगणें ।
उच्चनीच भेद कोण्या कारणे ।
समाजांत ॥३४
ऐसे नाना प्रश्न सतावती ।
कोणी करीना जिज्ञासा पूर्ति ।
वयासंगें समस्या वाढती ।
अनिवार ॥३५
फिरे काळाचें अमोघ चक्र ।
घडे विघडे मनुष्य संसार ।
उदय अस्त क्रम साचार ।
सॄष्टिमाजी ॥३६
ओढवे आपत्ति कुटुम्बात ।
देह ठेवती शिवराम पंत ।
देउनी ब्राह्मणमित्रा निश्चित ।
पूर्वसूचना ॥३७
येतां प्रतिकूल परिस्थिति ।
ज्येष्ठ बंधू मुंबईस जाती ।
चरितार्थाची सोय पाहती ।
भाग्यानुसार ॥३८
तेव्हां चरित्रनायक तरुण ।
तया वाटे करावें आपण ।
निजभाग्य शोधण्या प्रयाण ।
मुंबापुरीस ॥३९
जेहवां वय वर्षें एकवीस ।
साधुनी सुयोग्य संधीस ।
केलें गमन भाग्यनगरीस ।
उत्साहभरें ॥४०
मानव चाले पुढत पुढती ।
न कळे भाग्यचक्राची गती ।
जीवनमार्गीं वळणें अति ।
रहस्यमय ॥४१
__________________________________
॥ इति द्वितीयोल्लास ॥
--
॥ श्री गु रु च र णा र्प ण म स्तु ॥
__________________________________
--
ॐ
--
॥ श्री गु रु च रि ता नं द ॥
_______________________
॥ तृतीय उल्लास ॥
ॐ
॥ श्री स द्गु रु स म र्थ ॥
____________________________
नमो श्रीगुरुचरण पावन ।
प्रकटे तेथें गंगेसमान ।
कृपातीर्थ अमृतजीवन ।
संजीवनी ॥१
सेवितां कृपासंजीवनीबिंदु ।
गवसे आत्मानंदाचा सिंधु ।
तेणे वाढो श्रीगुरुसेवानंदु ।
चरितगानीं ॥२
नवल नगरी मुम्बापुरी ।
तिच्या सदा अतृप्त उदरीं ।
नाना उद्योग उलाढाळी भारी ।
रात्रंदिन ॥३
मनुष्य मुंग्यांचें महावारूळ ।
लक्षलक्ष पळती सर्वकाळ ।
मोहलुब्ध रावरंक सकळ ।
नानाप्रकारें ॥४
नसे केवळ मोहनगर ।
जणूं पसरे महाअजगर ।
ग्रासी पचवी क्षुधित उदर ।
असंख्यजीवां ॥५
घेई चरित्रनायक तरुण ।
प्रथम काहीं इंग्रजी शिक्षण ।
उपरान्त राही कारकून ।
अल्पकाळ ॥६
परि स्वभाव स्वतंत्र विचारी ।
तया रुचेना कोठें चाकरी ।
कासया पत्करावी ताबेदारी ।
पोटासाठीं ॥७
शोधितां गवसे स्वतंत्र क्षेत्र ।
मध्यम व्यवसाय व्यापार ।
कल्पक वृत्ती उद्योगी जबर ।
सुनिश्चयी ॥८
व्यवसायीं प्रथम सचोटी ।
तीच यशदायक हातोटी ।
तेणे होतसे निश्चित भेटी ।
धनश्रीची ॥९
चरित्रनायका लक्ष्मी प्रसन्न ।
परि न विसरे नारायण ।
आवडे नित्य पूजनभजन ।
भगवंताचें ॥१०
यथासमयीं गृहस्थाश्रम ।
स्वीकारी समाजकर्मी उत्तम ।
पत्नी सुमतीबाई परम ।
सहधर्मिणी ॥११
चरित्रनायका व्रताचरण ।
आवडे नेमाने उपोषण ।
भुलेश्वरादि देवदर्शन ।
भक्तिभावें ॥१२
मातोश्रींच्या हातीं फुलें अर्पुनी ।
प्रातः प्रणाम पूज्यचरणीं ।
नित्यचारा गोमातेच्या वदनीं ।
सेवाभावें ॥१३
आवडे ग्रंथ देवभक्तीपर ।
विशेष नवनाथ भक्तिसार ।
तेणे गुरुभक्तीचे संस्कार ।
दृढावती ॥१४
त्याकाळीं नजीक गिरगावांत ।
योगी आठवले वास करीत ।
तयापाशीं योगशिक्षण घेत ।
आवडीनें ॥१५
समानशील स्नेही उदार ।
यशवंतराव बागकर ।
तयांसंगें गोष्टी भक्तिपर ।
चालती नित्य ॥१६
बागकर जाती संतदर्शना ।
तयांच्यां कथा सांगती नाना ।
भावरसाळ वर्णन श्रवणा ।
लागे गोड ॥१७
साग्रह वदती बागकर ।
"चला मजसंगें एकवार ।
संतसंग साधावा हितकर ।
श्रद्धाभावें " ॥१८
देती उत्तर चरित्रनायक ।
"तुमचें वचन हितकारक ।
मजहि आदर वाटे सम्यक ।
संतवचनीं ॥१९
परि ह्या बकाली शहरांत ।
अति दुर्लभ खरा साधुसंत ।
बुवावेषी संधीसाधु बहुत ।
स्वार्थी भोंदू ॥२०
ऐशा मनुष्याकृतीचे चरण ।
न कदापि समस्तक वंदीन ।
ही माझी प्रतिज्ञा मज प्रमाण ।
निश्चयेंसी ॥२१
शोधुनी न भेटती संतजन ।
लाभे आपोआप शुभदर्शन ।
तत्काळ पटे अंतरीं खूण ।
पुण्यबळें ॥२२
ऐसा भाव परम सोज्वळ ।
पहा होईल सत्वर सफळ ।
पुढील गुरुकृपारसाळ ।
उल्लासांत ॥२३
॥ इति तृतीयोल्लासः ॥
_____________________
॥ श्री गु रु च र णा र्प ण म स्तु ॥
______________________
*
ॐ
--
॥ श्री गु रु च रि ता नं द ॥
_______________________
॥ चतुर्थ उल्लास ॥
ॐ
॥ श्री स द्गु रु स म र्थ ॥
____________________________
नमो श्री सद्गुरुकृपाघन ।
चिदाकाशीं वर्षाव प्रसन्न ।
तेणे भक्तचातकाचें सुमन ।
प्रफुल्लित ॥१
तयाची सुरंग शोभा कोमल ।
स्निग्ध भावरस परिमल ।
पसरे काव्यानंद मंगल ।
चरितगानीं ॥२
त्याकाळीं परम योगीराज ।
श्रीसिद्धेश्वर महाराज ।
करिती ज्ञानदानाचें काज ।
मुंबापुरींत ॥३
तयांचे दर्शना बागकर जातीं ।
यथाकाळीं अनुग्रह प्राप्ती ।
अंतरीं समाधान पावतीं ।
गुरुकृपेने ॥४
ते म्हंअतीं चरित्रनायकास ।
"चला एकवार दर्शनास ।
ठेवा ममवचनीं विश्वास ।
सत्कारणीं "॥५
सन्मित्राचा आग्रह पाहोनी ।
करी गमन संत दर्शनीं ।
अंतर्मुख बोध पडे श्रवणीं ।
सुकठीण ॥६
परि अंतर्यामीं अभिनव ।
जाणवे संततेजाचा प्रभाव ।
घ्हडे गमन दर्शनास्तव ।
वारंवार ॥७
प्रसन्न कृपाळू सद्गुरुसंत ।
तारक नाममंत्र सांगत ।
पटवून खूण हातोहात ।
निश्चयेंसी ॥८
सद्गुरु बोलतीं शब्द मधुर ।
"तुज हवें तें न चहाती इतर ।
इतर जनां हवें तें खरोख्रर ।
नको तुजला ॥९
पटतां खूण सद्गुरुवचनीं ।
साधक बैसे मनोजप ध्यानीं ।
गुंजरे सुमधुर नामध्वनी ।
अंतरांत ॥१०
होई चित्त एकाग्र सत्वर ।
भासती दिव्य रंग सुंदर ।
लाभली ध्यानावस्था साचार ।
आनंदमय ॥११
लाभतां सप्रचीत समाधान ।
सद्गुरुवचनीं विश्वास पूर्ण ।
परम पद सद्गुरुचरण ।
सत्शिष्यासी ॥१२
लाभो सद्गुरुपरंपरा थोर ।
नवनाथ पंथाची उदार ।
श्रीरेवणनाथ साधार ।
मूळ गुरु ॥१३
तयांपासून श्रीमरुळसिद्ध ।
सिद्धगिरीचे श्रीकाडसिद्ध ।
श्रीगुरुलिंगजंगम प्रसिद्ध ।
निंबरगीचे ॥१४
तत्शिष्य थोर श्री उमदीशराज ।
श्रीभाऊसाहेब महाआज ।
तयांचा समाधिवास सहज ।
इंचगिरीसी ॥१५
तयांचे सत्शिष्य पाथरीवासी ।
श्रीसिद्धरामेश्वर तेजोराशी ।
विज्ञानबोध देती शिष्यांसी ।
निरंतर ॥१६
हाचि थोर सिद्धसंप्रदाय ।
अथवा स्वरूपसंप्रदाय ।
शुद्ध ज्ञान-भक्तीचा समुच्चय ।
आत्मज्ञानीं ॥१७
श्रीसिद्धरामप्रभूचे निश्चित ।
श्रीमारुतीराय अनन्य भक्त ।
पूजनींभजनीं सदा रंगत ।
प्रेमानंदें ॥१८
देहमनीं जातीं लोटांगणीं ।
परमपूज्य सद्गुरुचरणीं ।
नुरली आस्था अंतःकरणीं ।
प्रपंचाची ॥१९
तत्पर प्राप्त कर्तव्यांत ।
पत्नीपुत्र कन्यांसहित ।
परि कर्ता सद्गुरु निश्चित ।
निश्चिय ऐसा ॥२०
सद्गुरुवचन हेंचि शास्त्र ।
वाटे बाकी सकळ अशास्त्र ।
सद्गुरुपदीं निष्ठा हेंचि शस्त्र ।
शिष्यवीरांचें ॥२१
बाणे ऐसा निश्चयाचा निश्चय ।
चित्त सदा निश्चिंत निर्भय ।
प्रकाशे सद्गुरुकृपा सूर्य ।
अंतर्यामीं ॥२२
चाले उत्स्फूर्त सकळ साधना ।
पूजाभजन ध्यान उपासना ।
साधनाकष्ट जाणवेना मना ।
कृपाबळें ।२३
नित्यश्रीसद्गुरुदर्शन ।
अगत्य सेवा धर्मपालन ।
भजन निरूपणश्रवण ।
एकाग्रचित्तें ॥२४
श्रीगुरुसंगें पाथरीग्रामासी ।
जातीं नेमें क्षेत्र इंचगिरीसी
सप्ताहास्तव बागेवाडीसी ।
उत्साहभरें ॥२५
चालता ऐसी यथार्थ साधना ।
ध्यानीं येती साधू देवता नाना ।
दिव्य प्रकाश नाद श्रवणा ।
अंतराकाशीं ॥२६
वाढतां सूक्ष्म बुद्धींचें तेज ।
गुह्य ग्रंथवर्म कळें सहज ।
वैखरी वाणींत प्रकटे ओज ।
प्रतिभादीप्त ॥२७
एकदा गुरुबंधुगृहीं जातीं ।
उत्स्फूर्त निरूपणें सांगतीं ।
आनंदें बागकर वदतीं ।
कौतुकभरें ॥२८
"देववृक्ष सत्यभामा सदनीं ।
परि फुलें रुक्मिणी अंगणीं ।
ऐसें नवल आज वाटें मनीं ।
गुरुकृपेचें ॥२९
लाभला श्रीगुरुसहवास ।
तीन वर्षें श्रीमहाराजांस ।
अंतीं पातलें साल छत्तीस ।
निर्वाणाचें ॥३०
जाणोनि गुरुकार्यसमाप्ति ।
श्रीसिद्धराम देह ठेविती ।
आश्विन वद्य एकादशी तिथि ।
पुण्ययोग ॥३१
हरपे सगुण सद्गुरुरूप ।
हाय, कोठें पूज्य मायबाप ।
भक्तहृदयीं दारुण कंप ।
वियोगाचा ॥३२
शून्य भासे अवघी धरती ।
तप्त दुःखाश्रुधारा झरती ।
कोठें पहावी सद्गुरुमूर्ती ।
प्रियदर्शन ॥३३
दाटे हृदयीं विरह दाहक ।
हरपे, नाठवे तहान भूक ।
स्मरती श्रीगुरुचे शब्द वेधक ।
वारंवार ॥३४
"शिष्यांमाजीं अनेक विद्वान ।
अनेक व्यवसायी सधन ।
अनेक अधिकार संपन्न ।
राजकर्मी ॥३५
परि ऐसा कोण शिष्यवर ।
जो सद्गुरु वचनाखातर ।
सर्वत्याग करण्या तत्पर ।
अनन्यभावें ॥३६
श्रीगुरुचा शोधक शब्दबाण ।
वेधी सत्शिष्याचें अंतःकरण ।
सदा तयाचें अनुसंधान ।
आपेआप ॥३७
न रुचे प्रपंच व्यवसाय ।
आवडे जीवन त्यागमय ।
अनिकेत निःशंक निर्भय ।
वैराग्यशील ॥३८
क्रमे पातली पुढील दिवाळी ।
सर्वत्यागाची उर्मि उसळली ।
भरसणांत पावलें वळलीं ।
परिभ्रमणा ॥३९
मागें सांडिला संपन्न संसार ।
प्रेमळमाता पत्नीकन्यापुत्र ।
कोणासी न सांगतां सत्वर ।
मुंबईत्याग ॥४०
’जयगुरु जयगुरु’ स्मरोनीं ।
निघती निःसंग परिभ्रमणीं ।
पातलें महायोग पीठस्थानीं ।
पंढरीसी ॥४१
त्यजुनी सारें अवशिष्ट धन ।
अंगावर जें वस्त्र प्रावरण ।
तयाचें सढळ दिधलें दान ।
गोरगरीबां ॥४२
शोभे साधा पंचा घोंगडी काठी ।
प्रखर वैराग्य भरतां पोटीं ।
हवी जया गुरुकृपेची भेटी ।
केवळचि ॥४३
चाले अखंड सद्गुरुस्मरण ।
नामस्मरण चिंतनमनन ।
एकाग्रचित्ती अनुसंधान ।
आत्मस्वरूपी ॥४४
नसे अन्नवस्त्राची मुळीं चिंता ।
श्रीसद्गुरु तयांचा रक्षिता ।
जेवीं बालका संभाळी माता ।
रात्रंदिवस ॥४५
नकळे भाषा दक्षिन प्रांती ।
दोन घांस न मागतां मिळती ।
स्वच्छंद पदयात्रेची गति ।
अखंडित ॥४६
दीर्घ वाटचाल चालोनी ।
पोळती पावलें अनवाणी ।
परि आनंद श्रीगुरुस्मरणीं ।
कृपाशीतल ॥४७
सेवितां वृक्षातळीं विश्रांती ।
तप्त पावलें न्याहाळती ।
प्रगटे दिव्य श्रीसद्गुरुमूर्ति ।
प्रियदर्शन ॥४८
तत्काळ सर्वश्रम परिहार ।
उचंबळे गुरुप्रेम अपार ।
कृपामृत सेवितां अनिवार ।
झरती अश्रू ॥४९
मासामागून सरती मास ।
प्रपच विसरोनी सद्गुरुदास ।
दक्षिण भ्रमणांतीं उत्तरेस ।
चालती वाट ॥५०
एकदां भ्रमतां मरुभूमींत ।
निर्जन उजाड रखरखीत ।
सूर्य माथ्यावर धगधगीत ।
मध्यान्ह काळीं ॥५१
अंतरीं अखंड नामस्मरण ।
दिसेना बाह्य विश्रांतिस्थान ।
नसे पाणी शमविण्या तहान ।
जरी ना अन्न ॥५२
पुढें चालती ’जयगुरु’ स्मरोनी ।
सर्व भार सद्गुरुचरणीं ।
तेणे सर्वदा निश्चिंत मनीं ।
परिभ्रमण ॥५३
दिसे अकस्मात् दूर वस्ती ।
विश्रांतीस्तव तिकडे वळती ।
सन्मुख एका झोपडी पुढती ।
उपस्थित ॥५४
अतिथी साधू पाहोनी दारीं ।
मालक देई पाणी भाकरी ।
तेंचि सेवितीं मानुनी अंतरीं ।
गुरुप्रसाद ॥५५
चालतां काही पवलें मार्गांत ।
चमके विचार अवचित ।
कैसी झोपडी वाळवंटांत ।
भेटली इथे ॥५६
सहज वळून मागें पहाती ।
कोठें देसेना झोपडी ती ।
जणू विरली नवल वस्ती ।
स्वप्नासमान ॥५७
प्रत्यक्ष गुरुकृपेचा महिमा ।
देखतां उचंबळे गुरुप्रेमा ।
स्मरतां श्रीसद्गुरु सिद्धरामा ।
झरती अश्रू ॥५८
पदयात्रा चालतां बहुमास ।
पातले राजधानी दिल्लीस ।
जावें हिमालयीं तपश्चर्येस् ।
ऐसी वासना ॥५९
संसार सांडला जाहलें ठीक ।
मिथ्याती उपाधि निरर्थक ।
करावें नरजन्माचें सार्थक ।
गिरिकंदरीं ॥६०
अंतरीं दृढावे ऐसा बेत ।
परि वेगळेंचि विधिलिखित ।
भेटे गुरुबंधु अवचित ।
सन्माननीय ॥६१
गुरुबंधु बोले "अहो निःसंग ।
धन्यधन्य तुमचा सर्व त्याग ।
तेथून पुढें कोणता मार्ग ।
सांगा मजसी" ॥६२
ऐकोनी हिमालयवासाचा बेत ।
गुरुबंधु म्हणे, "नव्हे हें उचित ।
करावें कर्तव्य संसारांत ।
पत्करलें जें ॥६३
प्रपञ्च साधुनी परमार्थ ।
हाचि आम्हां गुरुबोध यथार्थ् ।
पहा गुरुपरंपरा समर्थ ।
काय सांगे ॥६४
जाणोनि निज सत्यस्वरूप ।
प्रपञ्च करावा परमार्थरूप ।
साधावा लोकसंग्रह अमाप ।
सर्वहितासी ॥६५
’तोचि ज्ञानी खरा तारी दुजियांसी’ ।
ओळखा या अभंग-वचनासी ।
लोकारण्यामाजी एकांतवासी ।
यथार्थ ज्ञानी ॥६६
जैसें कमलपत्र पाण्यांत ।
अथवा तरंगे नवनीत ।
तैसाज्ञानी राहे संसारांत ।
स्थितप्रज्ञ" ॥६७
ज्येष्ठ गुरुबंधु गुरुसमान ।
त्याचें वचन मानुनी प्रणाम ।
मान्य जाहलें अंती गमन ।
मुंबापुरीसी ॥६८
गुरुबंधू स्नेहशील उदार ।
सहाय्य करण्या अतितत्पर ।
साधुवेष त्यागुनी सत्वर ।
माघारीं येतीं ॥६९
संतोषतीं निकट आप्तजन ।
अवघे गुरुबंधु सज्जन ।
चाले उदंड गुरुभजन ।
आनंदभरें ॥७०
भावी भक्तांचें सौभाग्य परम ।
लाभले श्रीमहाराज अनुपम ।
तीच कथा ऐका रसाळ पञ्चम ।
उल्लासांत ॥७१
--
॥ इति चतुर्थोल्लास ॥
______________________
॥ श्री गु रु च र णा र्प ण म स्तु ॥
______________________
*
ॐ
--
॥ श्री गु रु च रि ता नं द ॥
_______________________
॥ पञ्चम उल्लास ॥
________________________
ॐ
॥ श्री स द्गु रु स म र्थ ॥
____________________________
नमो श्रीसद्गुरु आत्मारामा ।
निर्विकल्प परमानंद धामा ।
न कळे न कळेतव महिमा ।
वेदश्रुतीसी ॥१
तव कृपाबळें केवळ ।
गाईन चरितगान रसाळ ।
वाक्दुर्बळासी वाणीबळ ।
तवप्रसादे ॥२
श्रीमहाराज सोसती शांतमनीं ।
व्यवसायाची अपार हानी ।
चरितार्थस्तव बैसती दुकानी ।
एकमेव ॥३
पडती अन्य दुकाने परहाती ।
परि श्रीमहाराज संतोषती ।
म्हणती बरवें जाहले गेली ती ।
उपाधिभारी ॥४
उपजीविकेस्तव व्यवसाय ।
व्यवहार करिती हस्तद्वय ।
परि चित्त सदातन्मय ।
गुरुस्मरणीं ॥५
मुखीं अंतरीं सहज मौन ।
जनीं परिमित संभाषण ।
स्वरूपानुसंधानी सदामग्न ।
अंतर्मुख ॥६
एकमुखी निष्ठा सद्गुरुचरणीं ।
न वाटे जावें बाह्य देवस्थानी ।
अथवा अन्य साधुदर्शनीं ।
कदाकाळीं ॥७
ध्यानधारणा नित्यनेमस्त ।
चाले सर्वदा सहजस्फूर्त ।
त्रिकाल भजनीं प्रेमे रंगत ।
अनन्यभावें ॥८
दासबोध योगवासिष्ठवाचन ।
चाले अंतरीं चिंतनमनन ।
ध्यानामाजी शंकानिरसन ।
आपेआप ॥९
हरपे भान उत्कट भजनीं ।
दंग आत्मप्रकाश दर्शनीं ।
झळके तेजाळ कुंडलिनी ।
आत्मशक्ति ॥१०
नाना दिव्य अनाहत नाद ।
उसळे अंतरीं परमानंद ।
ऐसा लाभे दिव्य गुरुप्रसाद ।
सुधामधुर ॥११
जैसा गज शिरतांमदोन्मत्त ।
झोपडी भग्न डळमळीत ।
तैसा देह होय व्याधिग्रस्त ।
योगसाधनीं ॥१२
परि सद्गुरुनिष्ठा अढळ ।
तेचिं सत्शिष्याचे खरें बळ ।
तेणें शीघ्र निरसती सकळ ।
अधिंव्याधी ॥१३
होतां चित्तशुद्धिसाधना पूर्ण ।
जाहलें निजांगें स्वरूपज्ञान ।
अपरोक्ष सच्चिदानंदघन ।
साक्षात्कार ॥१४
प्रकटे अलक्ष आत्मज्योति ।
शुद्ध निजरूप जगज्ज्योति ॥
नित्य निरंजन सर्वात्मत्मस्थिति ।
अद्वयवस्तु ॥१५
तेंचि शुद्ध चैतन्य-रसाळ ।
श्रीगुरुकृपेचें अमृतफळ ।
जीवनमुक्तिरूप केवळ ।
सिद्धस्थिति ॥१६
चाले निर्लिप्त बाह्य व्यवहार ।
सुखदुःखीं समदृष्टि सुस्थिर ।
सौम्य शांत सुधीर गंभीर ।
स्थितप्रज्ञ ॥१७
झेलती नाना आघात दारुण ।
माता-पिता-कन्या निधन ।
व्यवसायी अपार हानी कठिण ।
समस्यारूप ॥१८
परि निश्चिंत निर्भय निश्चल ।
वदती सिसुनी विपत्ती सकळ ।
"असेल माझे भाग्य तर येतील ।
संकटें नित्य "॥१९
टाळण्या उपाधि कोठें न जातीं ।
अथवा कोणासी न पाचारती ।
दुकानीं वा गृह-गुहेंत बैसतीं ।
एकांतवासी ॥२०
परि पुष्पगंध वा सत्त्वतेज ।
कधीं ना कधीं प्रकटे सहज ।
तैसे तळपती श्रीमहाराज ।
तपोमूर्ति ॥२१
प्रिय गुरुबंधू श्रीभाईनाथ ।
शांत सौम्य सात्त्विक यथार्थ ।
चोखाळती ज्‘जान-भक्ति सुपंथ ।
निश्चयेंसी ॥२२
ते भेटती रात्री नित्य नियमित ।
तयांसंगें ज्ञानचर्चा एकांतांत ।
उपेक्षुनी सकळ वर्षा शीत ।
विघ्नेंनाना ॥२३
उभयतांची गाध स्नेहभेटी ।
तियेसी न होय कदापि तुटी ।
असतां एकरूप ज्ञानदृष्टि ।
विज्ञानासी ॥२४
पाहोनी प्रगट सिद्धतेज ।
जमती चहाते भक्त सहज ।
परि उपेक्षती श्रीमहाराज ।
तैसी उपाधि ॥२५
विनविति भक्त वारंवार ।
करावा गुरुबोध सत्वर ।
राहू अज्ञापालनी तत्पर ।
सर्वकाळीं ॥२६
परि श्रीमहाराज दुर्लक्षती ।
गुरुपदाची उपाधि टाळती ।
रोखुनी दाहक दृष्टिं बोलती ।
कठोर शब्द ॥२७
गुरुदीक्षेस्तव हट्टी भक्तांसी ।
धाडिती अन्य गुरुबंधूपाशीं ।
परि कदापि न रुचे अनन्यांसी ।
पर्याय तैसा ॥२८
प्रतीक्षा करिती ऐसे भक्त ।
वर्षानुवर्षें दर्शना जात ।
गुरुकृपेस्तव तळमळे चित्त ।
अतिशयेंसी ॥२९
सद्गुरु-आदेश लाभोनि अंतॊं ।
श्रीमहाराज नाममंत्र देतीं ।
ज्ञान-भक्तीचा बोध करिती ।
अमृतोपम ॥३०
शिष्य जमती गुरु-आश्रामात ।
श्रीसिद्धराम पूजन नियमित ।
ध्यान-भजनीं निरूपणीं रंगत ।
श्रीगुरुसंगें ॥३१
श्रीमहाराज स्नेहाळ ।
निर्लोभी निस्पृह निर्मळ ।
चाले ज्ञानदान नित्य बहुकाल ।
निरपेक्ष ॥३२
वाक्शैली न-विचारी उत्स्फूर्त ।
प्रभावी आत्मनिश्चयी निश्चित ।
विशिष्टार्थ आगळे स्वप्रचीत ।
आध्यात्मिक ॥३३
गुरुसामर्थ्याची प्रचीति शिष्यांसी ।
परि नसे भीड श्रीमहाराजांसी ।
मानती सिद्धि-चमत्कारांसी ।
अस्पृश्यचि ॥३४
प्रगट अभिमान गुरुनाम ।
श्रीनिसर्गदत्त यथार्थ परम ।
आकळे ज्ञानदृष्टीने वर्म ।
विनासायास ॥३५
निसर्ग म्हणजे अखंड सहज ।
दत्त म्हणजे हजर प्रत्यक्ष ।
निसर्गदत्त म्हणजे सत्यस्वरूप ।
श्रीसमृद्ध ॥३६
श्रीमहाराज कांहीं न मागती ।
भार न घालती शिष्यांवरतीं ।
श्रीसमर्थवचन निरोपिती ।
स्वप्रचीतीनें ॥३७
"ऐका शिष्या येथीच वर्म ।
स्वयें तूंचि आहेसी ब्रह्म ।
ये विषयीं संदेह भ्रम ।
धंरुचि नको ॥३८
सोऽहं आत्मा स्वानंदघन ।
अजन्मा तो तूंचि जाण ।
हेंचि साधूचें वचन ।
सदृढ धरावें ॥३९
हाचि गुरुमंत्र बोध यथार्थ ।
साधी साधकाचा परम स्वार्थ ।
शिवस्वरूपें होय परमार्थ ।
स्वरूपसिद्ध ॥४०
शोधावें अखंड सावधान ।
अहं जाणिवेचे उगमस्थान ।
तेंचि निजांगें शुद्ध आत्मज्ञान ।
सर्वात्मक ॥४१
त्या ठायीं प्रकटे मूळ कालातीत ।
आपलें असणें अवस्थातीत ।
अलक्ष अनाम स्वरूप शाश्वत ।
आत्मपद ॥४२
ऐसें उत्स्फूर्त स्वानंदघन ।
सहज स्वस्वरूपानुसंधान ।
हेंचि सोपें नैसर्गिक साधन ।
निसर्गयोग ॥४३
धरावें निसर्ग-योग वर्म पोटीं ।
साध्य-साधक-साधन-त्रिपुटी ।
सांडुनी आपली आपणा भेटी ॥
मूळठायीं ॥४४
सद्गुरुबोधाची ही ज्ञानज्योति ।
साधकांसी विशुद्ध तेजारति ।
सेवितां विवेक वैराग्य प्राप्ति ।
विभूतिरूप ॥४५
सद्गुरुप्रसादज्ञानामृत ।
संतोष समाधान अखंडित ।
सदा अंतर्मुख आत्मरत ।
गुरुचरणीं ॥४६
शांतिलाभ निजांगें अमोलिक ।
यथार्थ जीवनाचें सार्थक ।
ऐसा सद्गुरुचरणसेवक ।
कृतकृत्य ॥४७
ईश्वर- गुरु-आत्मा एकरूप ।
ऐसा निजविश्वास आपेआप ।
तोचि आत्मयोगी परंतप ।
सद्गुरुभक्त ॥४८
धन्य धन्य सद्गुरुभक्ति ।
धन्य धन्य गुरुकृपाप्राप्ति ।
न वर्णवे निगूढ महति ।
अवर्णनीय ॥४९
अगम्य संतसद्गुरुमहिमा ।
न चले मायिक सगुण उपमा ।
सहज मौन अथांग गुरुप्रेमा ।
मौनामाजी ॥५०
आतां विश्वात्मकें सद्गुरुदेवें ।
येणें शब्दोल्लासे संतोषावें ।
ऐकतां बोबड बोल हेलावें ।
माऊली जैसी ॥५१
नुरे अक्षम लेखणीची धांव ।
बरवा गुरुपदीं मौन भाव ।
विनवी गुरुदास द्यावा ठाव ।
कृपावक्षीं ॥५२
--
इति पञ्चमोल्लासः
_____________________
॥ श्री गु रु च र णा र्प ण म स्तु ॥
______________________
ॐ
No comments:
Post a Comment